जायकवाडी धरणातील मृत पाणीसाठा झाला मासेमारी व्यावसाय अडचणीत
पैठण (प्रतिनिधी) : इ, सन २०२४ चा ऊन्हाळा अति तापमानाचा पारा चढला आहे मागील वर्षीला पाऊस सरासरी पेक्षा कमी पडल्याने कमी पडला कधीही जायकवाडी प्रकल्पातील पाणी मृतसाठ्या वर येण्याची पहिलीच वेळ आली मराठवाड्यातील नागरीकांची तहान भागवण्यासाठी शेती जलसिचनासाठी औद्योगिक क्षेत्रातील कपंनी उद्योगांना पाणी पुरवठा केला जातो

जायकवाडी धरणातुन नगर जिल्ह्यातील शेवगाव नेवासा तालुक्यातील छ, संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण गंगापूर या चार पांच तालुक्यातील कहार समाजाचे बांधव भगिनी मासेमारी व्यावसाय करून आपल्या कुटूंबाच्या पोटाची खळगी भरतात जायकवाडी जलाशयाने तळ गाठल्याने मासेमारी व्यवसाय अडचणीत
सापडला आहे उपासमारीची वेळ आली शासनाने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कहार समाज युवा प्रतिष्ठान अध्यक्ष रमेश गव्हाणे यांनी केले त्याच प्रमाणे पैठण या शहरा कडे. बघण्याचा दृष्टी कोन ऐतिहासिक वारसा धार्मिक वारसा लाभलेलं शहर सततची पर्यटकांचां बारामाही वर्दळ असते कोणी गोड माशाचा आस्वाद घेण्यासाठी दाखल होत असते तर कोणी २००६ महापुर बघण्यासाठी येत होते आजच्या घडीला तापमानात वाढ झाली जायकवाडी धरणात पाणी मृत साठा पैठणकर नाथचरणी मस्तक होऊन पाऊस लवकर पडू दे हीच प्रार्थना कहार समाजाचे रमेश गव्हाणे यांनी साकडं घातलं