कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः दोन आरोपी अटकेत
कन्नड. (प्रतिनीधी) : संत सेवालाल आणि मारुती मंदिरातील घंटा, समई आणि नंदादीप असेपूजेचे पितळी साहित्य चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना, ग्रामस्थांनी बदडून काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोन्ही आरोपींना कन्नड शहर पोलिसांनी अटक करून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात कन्नड शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मोहडी तांडा येथील संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरातील एक लहान एक मोठा पितळी घंटा एक पितळी समई आणि भाट्या मारुती मंदिरातील दोन पितळी नंदादीप असे साहित्य १३ मे च्या रात्री ते १४ मे च्या सकाळच्या दरम्यान दोन चोरांनी चोरी केले. १४ मे च्या सकाळी संत सेवालाल महाराज मंदिरातील पुजारी धनसिंग तुकाराम राठोड हे मंदिरात पूजेसाठी गेले असता त्यांना मंदिरात दोन घंटा व एक समई चोरी गेल्याचे आढळले

. त्यांनी ही बाब रोहन सुदाम चव्हाण यांना सांगितली. रोहन चव्हाण यांनी सोपान विलास चव्हाण, अरविंद दशरथ राठोड, सचिन सुभाष राठोड आणि साईदास रोहिदास चव्हाण यांना सोबत घेऊन मंदिरात जाऊन पाहणी केलीअसता चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या बाबत पोलिसांना माहिती देण्यासाठी ते कन्नडकडे येत असताना, रीड्डी येथे त्यांना नागरीकांचा जमाव जमलेला दिसला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता, त्या ठिकाणी गावातील नागरिकांनी दोन इसमांना पकडुन ठेवलेले तसेच त्यांच्या ताब्यात मंदिरातील साहित्य आढळुन आले. जमीर अहेमद शहागिर शहा (वय २४) आणि अलीम सलीम शहा (वय १९) राहणार रिड्डी तालुका कन्नड अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यात दोन पितळी घंटा, एक समई आणि दोन नंदादीप होते. या सर्व साहित्याची एकत्रित अंदाजे किंमत ९ हजार रुपये आहे. सदरील नंदादीप, पितळी घंटी, तांब्याच्या धातूचा नाग, तांब्याच्या धातूचा तांब्या व इतर तांब्या पितळीची पुजेची भांडी असा अंदाजे ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हा भाट्या मारुती मंदिरातून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी नागरिकांनी या चोरट्यांना बदडून काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.कन्नड शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी रोहन सुदाम चव्हाण व जगन बाबू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी आणि सहायक फौजदार श्रावण तायडे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.