पुणे (प्रतिनिधी महादेव सुरवसे) : संघटनेच्या विद्यमाने दिनांक १७ मार्च २०२४ रोजी रोपळे जिल्हा सोलापूर येथे संघटनेचे सहावे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी राज्यातील सर्व पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव पवार यांनी उपस्थित समुदायास संघटनेच्या संबंधी संघटनेची वाटचाल तसेच संघटनेची ध्येयधोरणे व जबाबदारी याबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे संघटनेचे राज्य प्रदेशाध्यक्ष अरुण कुमार कांबळे यांनी सुद्धा संस्थेत संघटनेच्या हडळ भटाचार विरोधी जन आंदोलन महाराष्ट्र राज्य कार्याविषयी माहिती दिली व संघटनेचे कार्य जोमाने करण्या विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करावी असा सल्ला दिलासदर अधिवेशन ग्रामीण भागात आयोजित केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या

