भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या भगवान बनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्यांच्या प्रार्थनांनी मिळाले जीवनदान !

भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणाऱ्या भगवान बनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; कार्यकर्त्यांच्या प्रार्थनांनी मिळाले जीवनदान !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : दि .१० फेब्रुवारी २०२५ – भ्रष्टाचाराविरोधी आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंगापूर पंचायत समितीचे भ्रष्टाचारी गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे आणि सोयगावचे गट विकास अधिकारी (चौकशी) अधिकारी यांनी कट रचून, भाडोत्री गुंडांच्या माध्यमातून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.घटना एमआयडीसी परिसरात घडली, जेव्हा बनकर आपल्या गाडीने संभाजीनगरकडे जात असताना त्यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. मात्र, “देव तारी त्याला कोण मारी?” ही म्हण खरी ठरली. कार्यकर्त्यांनी तत्काळ त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले व शासकीय उपचार मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले.

भगवान बनकर यांच्या जीवितासाठी अनेक कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, अखेर त्यांना जीवनदान मिळाले. भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहणाऱ्या भगवान बनकर यांनी पुन्हा नव्या जोमाने लढण्याची तयारी दाखवली आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून घाटी रुग्णालयात पेढे आणि बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. पत्रकार राखी जाधव, राहुल जाधव आणि निर्मला भालेराव यांनीही या वेळी उपस्थित राहून सामाजिक बांधिलकी दाखवली.या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *