भीमटोला आंदोलन थोडक्यात माहिती !

भीमटोला आंदोलन थोडक्यात माहिती !

खुलताबाद (प्रतिनिधि : सविता पोळके) कुलगुरू, कुलसचिव यांच्या हिटलर च्या प्रतिमा आंदोलकानी आणल्या होत्या विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करणयात आली. कुलगुरू डॉ.फुलारी आणि कुलसचिव अमृतकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचे दहन करण्यात आले. सिनेट सदस्य प्रा.सुनील मगरे,व्यवस्थापन परिषद सदस्य दत्ता भांगे, सुभाष राऊत, हरिदास सूर्यवंशी यांनी शिष्टमंडळाला बोलवून घेत गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा करायची असल्याचे सांगून बोलावले प्र. कुलगुरू डॉ.वाल्मिक सरवदे यांनी एकच कुणी बोला इतर विषयावर मी चर्चा करणार नसल्याची भूमिका घेतल्याने ही चर्चा निष्फळ ठरले प्रशासनाने आंदोलन दडण्यासाठी ही खेळी केली असल्याने आंदोलक विद्यार्थी प्रशासकीय इमारती बाहेर आले. विद्यापीठाची प्रतिमा मलिन केली जात असून बाबासाहेबांच्या नावाने असणाऱ्या विद्यापीठात एकाधिकारशाही निर्माण होणे हा महामानवाच्या नावाचा अवमान असल्याने आंदोलकांपैकी एक असलेले सचिन निकम यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत या हुकूमशाही चा निषेध केला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली.रिपब्लिकन विद्यार्थी सेना सम्यक विद्यार्थी आंदोलन पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी SFI, सत्यशोधक विद्यार्थी संघटना दामिनी महिला संघर्ष समिती युवक काँग्रेस आदी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते. आंदोलक सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, दिक्षा पवार, जयश्री शिर्के, ऍड अतुल कांबळे, प्रशांत बोराडे, संदिप तूपसमुद्रे, प्रा.देवानंद वानखेडे, जयपाल सुकाळे, लोकेश कांबळे, अमरदिप अवचार, विकास रोडे, अमरदिप हिवराळे, जयेश पठाडे, भीमराव वाघमारे, सुमेध बनकर, अक्षय जाधव, रत्नदीप रगडे, मंथन गजहंस, नारायण खरात,मनीषा बल्लाळ, निशिकांत कांबळे,कुणाल भालेराव, सागर ठाकूर आदींसह विद्यार्थी.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *