नाशिक प्रतिनिधी : भारतीबाई यशवंत पवार यांचा पुण्यनोमोदन तथा जलदान धार्मिक विधीचे आयोजन रोटरी क्लब हॉल नाशिक येथे संपन्न झाले. कालकथित मातोश्री भारतीबाई यांना उच्चशिक्षित विनोद यशवंत पवार ,राजेंद्र यशवंत पवार , सुप्रिया नाना नेटावटे असे दोन मुले आणि एक मुलगी आहे . यावेळी आईला कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. वाढत्या वृद्धाश्रमाची संख्या पाहता आईचे महान महत्त्व कळावे व सामाजिक कवितेतून जनजागृती व्हावी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आईच्या व परिवर्तनाच्या कवितांचे सादरीकरण जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे, संजय आहेरे, मनिषा मेश्राम , सुरेखा गायकवाड, देवभाऊ उबाळे आदी. प्रसिद्ध कवींनी केले. कर्करोगाची सर्वसामान्यांना माहिती मिळावी म्हणून ‘कर्करोग विषयावर माहिती व जनजागृती’ या विषयी व्याख्यानाचे आयोजन केले होते, प्रा. रोहिणी थविल व डॉ. सुरजकुमार मगर यांनी या विषयी व्याख्यान देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथाचा उपयोग होऊन भविष्यात प्रशासकीय अधिकारी व्हावे म्हणून आईला आदरांजली म्हणून राजेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून व पवार परिवाराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय जातेगाव यांस विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त ठरणारे महत्त्वाचे ग्रंथ व पंखा भेट देण्यात आला.

पवार कुटुंबातील सदस्यांकडून आईच्या व परिवर्तनाच्या कविता, कर्करोग विषयावर माहिती व्याख्यान अशा छान उपक्रमासह वाचनालयास ग्रंथ आणि पंखा भेट देऊन दुःखात ही एक चांगला समाज उपयोगी उपक्रम घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे मत यावेळी बोलतांना साहित्यिक नवनाथ रणखांबे यांनी आपले मत व्यक्त केले. पुण्यनोमोदन तथा जलदान विधी धम्मचारी शिल कुमार व धम्ममित्र प्रा. चेतन पवार यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार नाना नेटावटे यांनी केले. या कार्यक्रमास छत्रपति सेना महा.राज्यचे (संस्थापक) चेतन भाऊ शेलार, डॉ. जयेंद्र थविल (वैदयकिय अधिकारी), प्रकाश पगारे , संदिप पवार ( महा. पुलिस), रतन चौहान , पवार परिवारातिल सर्व सदस्य व आप्तेष्ट नातेवाईक उपस्थित होते .