कन्नड, (प्रतिनिधी) : शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन शेजारील भाजी मंडईतील तीन दुकानांना आग लागून नव्वद हजाराचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, दि.२८ मे रोजी सकाळी साडेचार च्या तुम्हाला ग्रामीण पोलीस स्टेशन शेजारील भाजी मंडईतील राजू केवट, गोरख राठोड पप्पू लांडगे या तिघांच्या भाजीपाल्याच्या दुकानास अचानक आग लागली या आगीत भाजीपाला व काही साहित्य जळून खाक झाले असून यात अंदाजे नव्वद हजाराचे नुकसान झाले आहे

.आगेचे कारण समजू शकले नाही. सकाळी फिरायला जाणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनीनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र दुकान लोखंडी जाळ्यांचे असल्यामुळे त्यात
विद्युत प्रवाह उतरलेला असल्यामुळे आग विझजवण्यात अडचणी आल्या त्यामुळे त्यांना फक्त बघतच राहावे लागले.