छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी) : पोलीसांची ही कारवाई सुडभावनेतून झाली आहे. याचा अर्थ त्यांना एकाच धर्माची पाठराखण करायची आणि इतर धर्माच्या उपासकांना डावलायचे हाच हेतु असुन या विरोधात आपण आवाज उठविणार आहोत असे भंते अभयपुत्र म्हणाले.विजयिंद अरण्य विहार बुद्धलेणी कमांक ७च्या पायथ्याशी वृध्दापकाळाने नैसर्गिक मृत्यु झालेल्या भंते धम्मरूप थेरो यांचा अंत्यविधी केल्यानंतर सरकारी जागेत अवैधरित्या अंत्यसंस्कार केला व सरकारी अधिकारी मज्जाव करीत असतांना अडथळा आणल्याच्या कारणावरून पोलिसांनी भंते अभयपुत्र, भंते सुदत्तबोधी, भंते अमृतानंद, भंते दिपांकर, भंते एस. राहुल यांच्या विरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ४४७, ५०६,३४ सह अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या विरोधात पत्रकार परिषद घेत भंते अभयपुत्र यांनी पोलिस प्रशासन तसेच महसुल विभागाच्या धिकाऱ्याविरोधात भुमिका मांडतांना म्हटले की दलित, बौद्ध, अल्पसंख्यांना प्रशासन हेतुपुरस्सर त्रास देत आहे, कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करत आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासुन आपण विजयिंद अरण्य विहार येथे वास्तव्यास असुन नियमित बौद्ध संस्कार विधी करीत आहोत, बौद्ध भिक्खु यांनी सर्वसंग त्यागलेला असतो, त्यांना नातेवाईक नसतात व समाजच त्यांचा अंतिम संस्कार करीत असतो. याआधी याच भुमिवर अनेकदा कालकथीत भिक्खुवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.

पण तेंव्हा कुणीही आडकाठी आणली नव्हती. मात्र यावेळी कुणाचाही विरोध नसतांना, केवळ कुणीतरी तकार केली म्हणुन लगेच पोलिस बल पाठवण्यात आलं आणि अंत्यसंस्काराच्या पवित्रप्रशासनाच्यावतीने बाधा उत्पन्न करण्याचा प्रयत्न झाला. हे अत्यंत खेदजनक असुन आमच्यावर हा एकप्रकारे अत्याचारच आहे. जर आम्ही समाजाची सेवा करण्यास पात्र नसलो तर जगुन काय उपयोग. म्हणुन मी आमचे व्हिएतनामचे महान धम्मगुरू पुज्य थीक क्वांगदक यांनी ज्याप्रमाणे अन्यायाच्या विरोधात आत्मदहन केले होते तसेच मी आत्मदहन करणार आहोत असे भंते अभयपुत्र म्हणाले. त्याआधी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी सात दिवसांचा वेळ देऊ. यादरम्यान आपण आमरण उपोषण करणार आहोत. सात दिवसांत कारवाई करण्यात आली नाही तर आठव्या दिवशी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असे भंते अभयपुत्र यांनी स्पष्ट केले. दरम्यान भंतेजींच्या या निर्णयानंतर बौद्ध, आंबेडकरी समाजामध्ये एकच खळबळ उडाली आहे.