पाथर्डी-श्रीक्षेत्र भगवान गडाच्या पालखीचे खरवंडी कासार येथे शनिवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांनी दर्शन घेतल्यानंतर या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. खरवंडी कासार येथे संत भगवान बाबांनी स्थापन केलेल्या भगवान विद्यालयातील लेझीम झांज पथक, झेंडेधारी, वारकरी विद्यार्थी, कलशधारी विद्यार्थिनी, ग्रामस्थांनी पालखीला सामोरे जात स्वागत केले. भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. के. भालेराव, खरवंडीचे सरपंच प्रदीप पाटील, प्रकाश कटारिया आदी उपस्थित होते. भगवान गडाचे संस्थापक संत भगवान बाबांनी भगवान गडाच्या स्थापनेपूर्वीच नारायण गडावर असताना, मराठवाड्यातून पहिली पंढरपूरसाठी दिंडी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा भगवान गडाच्या स्थापनेपासून ते आजतागायत सुरू आहे. शुक्रवारी भगबान गडावरून निघालेल्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान दुपारी चार वाजता झाले. पालखीचा पहिला मुक्काम भगवान गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भारजवाडी येथे होऊन सकाळी खरवंडी, मालेवाडी, भालगाव मार्गे शिरूर तालुक्यात प्रवेश झाला

. मार्गातील विविध गावांत भाविक दिंडीत सहभागी होत असल्याने मराठवाड्यातील सर्वात मोठी दिंडी म्हणून गडाच्या दिंडीकडे पाहिले जाते. खोकरमोह, करंजवण, पाटोदा, दिघोळ, कुंभेफळ, कुडूवाडी या मानि जाणार आहे. अकराव्या मुक्कामी पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. पंढरपुरात भगवानगड दिंडीला मान भगवानगड ते पंढरपूर आषाढी वारी सोहळा संत भगवान बाबांनी भगवान गडाच्या स्थापनेपूर्वी नारायण गडावर असताना १९२१ मध्ये सुरू केला. येथील दिंडी सोहळ्याला शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा आहे. संत भगवान बाबा यांच्या निर्वाणानंतर भगवान गडाचे दुसरे मठाधिपती भीमसिंह महाराज यांनी हीच परंपरा चालू ठेवली. २००३ मध्ये भगवान गडाचे तृतीय मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री झाल्यानंतर त्यांनी भगवान गडाच्या दिंडीचे भव्य दिव्य पालखी सोहळ्यात रुपांतर करीत संत भगवान बाबांच्या पादुकासाठी विशेष रथ तयार केला.