छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी): अखिल.भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे १५१ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. समर्थनगर येथील राम मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर अंजली कुलकर्णी, महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी १० वी व १२ वीतील १५१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात

सूत्रसंचालन दीपक कुलकर्णी यांनी केले, तर आभार सुचेता पालोदकर यांनी मानले. पाहुण्यांचे स्वागत संजय टोणपे, अंजली देशपांडे, डॉ. मयूरी कुलकर्णी, अंजली गोरे, सीमा नंदापूरकर यांनी केले. यावेळी दिलीप लाड, मोहन काळे, संदीप बेदरकर, सुहास ठोसर, गायत्री न्यायाधीश, श्रीनिवास लिगदे, स्मिता नगरकर, प्रफुल्ला जोशी, धनंजय ब्रह्मपूरकर, अविनाश देशपांडे, मयूर देशपांडे, उमेश काळे, शेखर क्षीरसागर, श्रुती काटे, अॅड. अश्विनी कुलकर्णी, गणेश भाले, संजय काळे, संजय पिंपळे व सुषमा धांडे आर्दीची उपस्थिती होती