बेताल वक्तव्ये करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा !

बेताल वक्तव्ये करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करा !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी : डॉ सचिन साबळे ) आज बीड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय खा.राहुलजी गांधी यांना जीवे मान्यची धमकी देत, जे राहुल गांधीजी यांची जीभ छाटून आणून देईल त्याला 11 लाख रुपये चें बक्षीस देऊ असं वक्तव्य करणारे भाजप महायुती तील शिंदे गटाचे बुलढाण्याचे आ.संजय गायकवाड आणि भाजपचे नेते माजी आ.तरविंदरसिंग मारवाह यांच्या विरोधात रीतसर गुन्हा नोंदवून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

यासंदर्भात मा. पोलीस अधीक्षक बीड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव मा. रविंद्रजी दळवी, काँग्रेस कमिटी बीड शहर अध्यक्ष परवेझ कुरेशी, ॲड.विद्याताई गायकवाड,ॲड.गणेश कारंडे, जयप्रकाश आघाव ,सफदर देशमुख ,सय्यद फरहान,सय्यद सिराज ,एड प्रेरणा सूर्यवंशी, मोहसीन भाई व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सोशल मीडिया समन्वयक अभिषेक दळवी यावेळी उपस्थित होते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *