बुद्ध लेणी परिसरात भगवान बुद्धाच्या जागेवर भूमाफियाचा कब्जा मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करून केले कंपाऊंड

बुद्ध लेणी परिसरात भगवान बुद्धाच्या जागेवर भूमाफियाचा कब्जा मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करून केले कंपाऊंड

गट क्र. २९ गायरन सरकारी जमिनीवर ‘लँड जिहाद’! तहसील विभागाच्या संगनमताने भू-माफियांचा बेकायदेशीर कब्जा? स्थानिकांचा गंभीर आरोप

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पहाडसिंगपुरा बुद्ध लेणी परिसरातील गट/ सर्वे क्रमांक २९ मधील गायरन सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन व अतिक्रमण सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे सर्व “लँड जिहाद” च्या माध्यमातून घडत असून, तहसील कार्यालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने भू-माफियांनी ही सरकारी जमीन हडपली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून या जमिनीवर जेसीबी आणि ट्रकच्या साहाय्याने उत्खननाचे काम सुरू असून, याठिकाणी अनधिकृतरित्या झोपड्या, पत्र्याचे शेड आणि बांधकामे उभी केली जात आहेत. हे सर्व होत असतानाही प्रशासन डोळेझाक करत आहे,

असा आरोप नागरिकांनी केला आहे.
“सरकारी जमीन असताना देखील कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय हे सर्व काम सुरू आहे. आम्ही याविरोधात अनेकदा तक्रारी दाखल केल्या, पण तहसील विभागाने काहीच कारवाई केली नाही,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. यासंदर्भात तहसीलदारांकडे विचारणा केली असता, “प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दोषींवर लवकरच कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले. मात्र, स्थानिक नागरिकांचा विश्वास आहे की प्रशासन स्वतःच या प्रकरणात सहभागी असून, त्यांच्याच आशीर्वादाने भू-माफिया बिनधास्तपणे आपली सत्ता प्रस्थापित करत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *