बुद्ध लेणी परिसरात पर्यावरणाची खुलेआम हत्या – डोंगर फोडून झाडांची निर्घृण कत्तल, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह?

बुद्ध लेणी परिसरात पर्यावरणाची खुलेआम हत्या – डोंगर फोडून झाडांची निर्घृण कत्तल, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह?

 छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :  ऐतिहासिक आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील बुद्ध लेणी परिसरात सध्या सुरू असलेली डोंगरफोड आणि मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड ही पर्यावरणाची सरळ हत्या मानली जात आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात भू-माफियांकडून बेकायदेशीर उत्खनन व झाडांची कत्तल सुरू असून, याला स्थानिक प्रशासन आणि तहसील कार्यालयाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या साथ दिली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या कारवायांमुळे निसर्गसौंदर्याचा ऱ्हास होतो आहे आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचे बिनधास्त उल्लंघन केले जात आहे. या कामासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आली आहे का, यावर प्रशासन पूर्णपणे मौन आहे, ज्यामुळे तहसील प्रशासन, वनविभाग व जिल्हा प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बुद्ध लेणी परिसरात सुरू असलेल्या या अवैध हालचालींमुळे पर्यटन, पुरातत्त्व वारसा आणि पर्यावरण यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. डोंगरांचे उत्खनन आणि वृक्षतोड थांबवण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे, की हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे, असा सवाल उपस्थित होतो.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *