बीड : विविध कारणामुळे आधीच चर्चे त असलेल्या बीडमधील एका मशिदीत स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड येथील अर्धमसला गावातील मशिदीत स्फोट झाला. गुढी पाडवा आणि ईद हे दोन महत्त्वाचे सण असतानाच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे पडले आहे. मात्र, पोलिसांनी संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रात्री २.३० वाजता हा स्फोट झाला. दोन तरुणांनी जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला. त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहेत. तसेच मशिदीतील फरश्याही फुटल्या आहेत. या स्फोटाचा आवाज आल्याने गावातील लोक खडबडून जागी झाले. मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अँटी करप्शन क्राइम कंट्रोल कमिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेख वसीम यांची प्रतिक्रिया !

महाराष्ट्रात बीड जिल्हा अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो त्यात पोलीस अधीक्षक बीड नवनीत कावंत हे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यास असमर्थ ठरत आहे यांनी बीड जिल्ह्याचा चार्ज घेतल्यापासून बीड जिल्ह्याचे गुन्हेगारी सूत्र अजूनच वाढत चालले असल्याचे दिसून येते आज रमजान सणाच्या काळात मशिदीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या षडयंत्र थांबवू शकले नाही थोडक्यात म्हणजे हे अधीक्षक बीड जिल्ह्यासाठी योग्य नाही याची तात्काळ दुसरीकडे नियुक्ती करून बीड जिल्ह्यासाठी एक सक्षम अधीक्षक म्हणून दुसऱ्या अधिकाऱ्यांना चान्स द्यावा!