बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, वाल्मिक कराड याला मारहाण

बीडच्या जेलमध्ये तुफान राडा, वाल्मिक कराड याला मारहाण

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. तसेच संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे. तर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली, नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते. दादा खिंडकर या मारहाणीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता

. मात्र त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरमधील हरसूल येथे करण्यात आली. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आठवले, गीते आणि कराड, घुले यांच्यामध्ये वाद सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर संबंधित कारागृहात पोलिसांची जादा कुमक देखील तैनात करण्यात आली होती. पण आज सकाळी पुन्हा बाचाबाची झाली आणि थोड्याच वेळात ती वाढून त्याचे रुपांतर वादात झाले. अक्षय आठवले, महादेव गीते हे दोघेही सुरूवातील त्यांच्यावर चालून गेले आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली असे वृत्त सध्या समोर आलं आहे. सकाळी नाश्ता झाल्यानंतर ११ च्या सुमारास जामीन मिळालेल्या आरोपींना बाहेर सोडण्यात येत. त्यावेळेस सर्व बंदी हे बराकीच्या बाहेर आलेले असतात. आज सकाळीही सर्व कैदी बाहेर आल्यानंतरच सदर प्रकार घडला आणि गोंधल उडाला. गीते गँग ही त्याच कारागृहात शिक्षा भोगत आहे तर मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारा आरोपी अक्षय आठवलेही त्याच बराकीमध्ये होता. महादेव गीते आणि अक्षय आठवले हे दोघे एकाच बराकीमध्ये आहेत. तर वाल्मिक कराडची बराक दुसरी आहे. मात्र नाश्त्यानंतर बाहेर आल्यावर दोन्ही गटात वाद आणि मारामारी झाल्याचे समजते. कराडने एका खोट्या केसमध्ये अडकवल्याचा गिते गँगचा आरोप आहे. आणि हाच आरोप करत, त्या मुद्यावरून ही मारहाण झाल्याचे समजते.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *