शिऊर : गेल्या वर्षभरापासून विविध भागात बिबट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या गाई-वासरांना फस्त केले होते. या सर्वांची नुकसान भरपाई वनविभाग देत असते. मात्र बिबटयाच्या हल्ल्यातील एका मृत गायीच्या नुकसान भरपाईपोटी मात्र केवळ आठ हजार रुपये भरपाई मिळाल्याने वनविभागाविरूध्द शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहेवैजापूर तालुक्यातील पोखरी, गारज, बायगाव, मनुर, साकेगाव, शिऊर, मनेगाव, लाखणी, भटाणा आदी भागात सन २०२३ या काळात बिबट्यांची मोठया प्रमाणात संख्या वाढलेली होती. शेतात पाळलेल्या गाई, वासरांना लक्ष करुन दावणीला बांधलेल्या कित्येक शेतकऱ्यांची जनावरे बिबटयांनी फस्त केले होते. परिसरातील उसात लपून बसत बिबट्यांनी वर्षभर शेतकऱ्यांना हैराण केले. विशेष बाब म्हणजे वनविभागाने एकाहीबिबटयाला पिंजरा लावून पकडण्याची तसदी घेतली नाही, त्यामुळे बिबट्याने शेतकऱ्यांच्या पशुधनावर ताव मारुन लाखो रुपयांचे नुकसान केले. या हल्ल्यात मृत गायींची नुकसान भरपाई म्हणून वनविभागाने केवळ आठ हजार रुपये शेतकऱ्याला देऊन बोळवण केली. यात अनेक गाभण गाईंचा

वनविभागाकडून शेतकऱ्यांची थट्टा, भरपाई आणखी वाढवून मिळण्याची मागणी
सुद्धा समावेश आहे. वास्तविक पाहता एक गाय विकत घ्यायला गेले तर बाजारात साठ ते सत्तर हजार रुपये मोजावे लागतात. मग वनविभाग शेतकऱ्यांना आठ हजार रुपये अनुदान देऊन का ? थट्टा करत आहे, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जातोय. दोन वर्षापूर्वी पोखरी परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या गाईंचे तीस हजार रुपये बहुतांश शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती. मग वनविभागाने आता का ? नुकसान भरपाई कमी दिली असा सवालही केला जात आहे. मृत जनावरांचे पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयात चकरा मारुन मारून आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या शेतकऱ्याला तुटपुंजी मदत देऊन वनविभागाने तोंडाला पाने पुसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत.