छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): फुलंब्री तालुक्यातील बाबरासह परिसरात चारा टंचाईच्या संकटाने जनावरे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. निसर्गाच्या सतत येणाऱ्या आपत्तीमुळे पाळीव जनावरांच्या संख्येत प्रमाणात घट होत आहे. मोठ्या दोन ते तिन वर्षापासून भेडसावण- ारी दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाईच्या समस्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. शेतकरी आपली जनावरे बाजारात कवडीमोल भावाने विक्री करीत आहे, यंदा शेतकऱ्यांचा पशु पालनाकडे
असणारा कलदेखील कमी होताना दिसुन येत आहे. पूर्वी शेतकऱ्यांची श्रीमंती त्यांच्या जवळील जनावरांच्या संख्यावरून ठरत असे त्यांमुळे शेतकऱ्यांच्या दारात जनावरांची दावन दिसत होती.
मागील काही महिन्यापासून काळात चारा व पाणी टंचाईच्या संकटामुळे ग्रामीण भागातील
शेतकऱ्यांवर दुभत्या जनावरांच्या संख्येत मोठी घट होतांना दिसत आहे. अनेकांनी आपली जनावरे विकली आहेत. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी दुधाला रास्त भाव द्यावा अशी मागणी बाबरा परिसरातील दुध उत्पादक, पशु पालक शेतकरी करीत आहेत.