छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : कार साफ करत असलेल्या एका मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना हसूल परिसरातील स्वराज्य चौsक अशोक नगर येथे घडली. या प्रकरणी हर्सल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश गायकवाड रा. अशोकनगर असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी रघुनाथ नाना घुगे रा. अशोक नगर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा विष्णू घुगे हा घरासमोर उभी कार साफ करीत होता. तर फिर्यादीच्या मुलीचा मुलगा पा रियांश वाघ हा खेळत होता. आरोपी बुलेट मोटरसायकलवर जात असताना फिर्यादीचा मुलगा विष्णू यांनी त्यांच्याकडे बघितले. त्यावर तू माझ्याकडे रागाने का बघतो

, तुझ्या बापाचा रोड आहे का असे म्हणून आरोपीने गाडी उभी केली. न फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करू लागला. त्यावर फिर्यादीने त्याला समजून सांगून तू येथून निघून जा असे सांगितले. त्यावर आरोपी तेथून निघून गेला व पुन्हा काही वेळाने घरासमोर येऊन फिर्यादी व फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ केली. तसेच चाकूने मुलाच्या डाव्या हाताच्या मनगटावर वार केला. फिर्यादी त्यांना वाचवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांच्या डाव्या हातावर वार केला. त्यात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाचा समोरचा भाग तुटला व ते गंभीर जखमी झाले.