छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : जळगाव महामार्गावरील फुलंब्री नजीक असलेल्या दरी फाटा येथील प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानाला शनिवारी (दि.९) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दुकानाचे शटर उघडण्यासाठी गेलेल्या तीन तरूणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने फुलंब्री परिसरात शोककळा पसरली आहे. यात नितीन रमेश नागरे (वय २५), गजानन वाघ (वय ३०), राजू सलीम पटेल (वय २५) रा. फुलंब्री अशी मृत्युमुखी पडलेल्या तरूणांची नावे आहेत. तर अजय सुभाष नागरे व शाहरूख पटेल रा. फुलंब्री हे आगीत गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली. जखमींना शहरातील घाटी रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्रीपासून एक ते दोन किमी अंतरावर असलेल्या दरी गावाच्या शिवारात जळगाव महामार्गावर राजू स्टील आणि प्लास्टिक नावाचे दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाण प्लास्टिक साहित्य भरलेले होते. शनिवारी रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी दुकानातील आतील भागात शॉक सर्किटमुळे आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला.

आग लागल्याची माहिती दुकान मालक व शेजारी असलेल्या दुकान मालकांना समजली. त्यांनी आरडाओरड करीत तिकडे धाव घेतली. दुकानावर पाणी फेकणे सुरू केले. दुकानातून आगीचे डोंब निघत होते. हे पाहून नितीन नागरे, गजानन वाघ, राजू पटेल, अजय नागरे व शाहरूख पटेल यांनी धाडस करीत दुकानाचे शटर जीवलग मित्र होते होमगार्ड… घटनेतील मयत गजानन वाघ व जखमी शाहरुख पटेल हे दोघे चांगले मित्र होते. ते होमगार्डमध्ये आहेत. शाहरुख पटेल याचा मयत भाऊ राजू पटेल याचे दुकान असल्याने हे आग विझविण्याकरीता घटनास्थळी गेले होते. फुलंब्री पोलिसांनी रात्री घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना घाटी रुग्णालयात दाखल केले. उघडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे शटर उघडताच आतमध्ये तयार झालेल्या गॅसमुळे आगीचा मोठा लोळ वेगाने बाहेर आला. या आगीच्या लोळात हे पाचही तरूण सापडले. तीन तरूण वेगाने बाहेर फेकले गेले, यात ते लोखंडी पार्टवर आदळले तसेच आगीत होरपळले. यात नितीन रमेश नागरे (वय २५), गजानन वाघ (वय ३०), राजू सलीम पटेल (वय २५) या तिघांचा मृत्यू झाला. तर घटनेत शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.