प्रसिद्ध कवी नवनाथ रणखांबे ” आयकॉन ऑफ नेशन ” यारेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

प्रसिद्ध कवी नवनाथ रणखांबे ” आयकॉन ऑफ नेशन ” यारेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

जम्मू राज्याच्या राणी डॉ. सुहासिनी सुदन आणि पद्मश्री पुरस्कार विजेता डॉ. विजयकुमार शहा यांच्या हस्ते सन्मान प्रदान भारत देशातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविणाऱ्या प्रतिभाशाली कार्यवीरांनचा सन्मान सोहळा संपन्न

(प्रतिनिधी पुणे ) रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचा राष्ट्रीय पुरस्कार सोहळामहाराष्ट्रातील सांस्कृतिक पुणे नगरीत विशाल समारोहाच्या अनुषंगाने जम्मू राज्याच्या राणी डॉ. सुहासिनी सुदन आणि पद्मश्री पुरस्कार विजेता डॉ. विजयकुमार शहा , यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय विविध पुरस्काराने सन्मानित, प्रसिद्ध कवी, जीवनसंघर्षकार फेम नवनाथ रणखांबे यांना आयकॉन ऑफ नेशन या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने नुकतेच पुणे -पिपरी येथील आचार्य आत्रे रंगमंदिर येथे सन्मानित करण्यात आले. भारत देशातील विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविणाऱ्या प्रतिभाशाली कार्यवीरांना ” सतरावे अखिल भारतीय प्रतिभा प्रेरणा महासंमेलना ” च्या पार्श्वभूमीवर ” आयकॉन ऑफ नेशन ” या राष्ट्रीय पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले . तसेच अंगभूत अद्भुत बुद्धिमत्ता व प्रतिभा धारण करून विविध क्षेत्रात गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध केल्याबद्दल निवडपात्र पुरस्कारार्थी यांना रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) मध्ये समाविष्ठ करीत आंतरराष्ट्रीय कीर्तिमान प्रमाणपत्र , स्मृतीचिन्ह , गोल्ड-मेडल आणि मेम्बरशिप बहाल करून गौरविण्यात आले . या विशाल पुरस्कार सोहळ्यात, “उन्नत व विकसित भारताचा पाया रचणाऱ्या व आपल्या मूल्याधिष्ठित कलोपासक कर्तृत्वाने आणि समर्पित साधनेतून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करीत देशाचे नाव जागतिक मंचावर गौरविणाऱ्या भारत देशातील गुणवंत व प्रतिभावंत व्यक्तींना पुरस्कृत कारण्याचे अद्भुत कार्य रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डने केले असून वास्तविक अर्थाने याचं पुरस्कारांच्या माध्यमातून प्रेरणा मिळते व प्रेरणेने राष्ट्र बलवत्तर होते. ” असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष डॉ.कौशिक गायकवाड यांनी यावेळी केले

. यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. कौशिक गायकवाड, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक आणि वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्सचे संस्थापक – मुख्य संपादक , जगप्रसिद्ध निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. क्रांती महाजन , राजामाता जिजाऊ यांच्या घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव , तंजावर घराण्याचे वंशज विजयसिंह राजे भोसले , भारत सरकारच्या G-20 चे डायरेक्टर तथा रूडकी आयआयटी चे रजिस्ट्रार संजीव जैन्थ , भारत सरकारच्या एनवायकेएस चे मेघालय मणिपूर नागालँड चे संचालक अतुल निकम , गोवा व महाराष्ट्र राज्याचे संचालक यशवंत मानखेडकर , कॅनडाचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. गुरतेज सिंग ब्रार , सीआयडी ऑफिसर आरिफा मुल्ला , समाजसेवक यशवंत कुर्वे , चीफ एडज्यूकेटर ज्युरी डॉ. एस. देवेंद्र , स्वागताध्यक्ष संतोष बारणे, आदी मान्यवर उपस्थित होते. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स अंतर्गत नोंदणीकृत वर्ल्ड सेव्हन वंडर्स पब्लिकेशन द्वारे संचालित रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स संपादक करून सरकारच्या इंटरनॅशनल सिरीज बुक नंबर ( आयएसबीएन / ISBN ) अंतर्गत प्रकाशित केले जाते . भारत आणि आशियाई देशांत आयोजित विविध समारोहांच्या माध्यमातून आरटीबीआर हे कीर्तिमान व अलंकरण बहाल केले जातात. जागतिक मंचावर आयोजन करणारी क्रियाशील रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड्स ( आरटीबीआर ) द्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभा , गुणवत्ता , सेवाभाव , कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेमुळे असामान्य कार्य करणाऱ्या मुलांना , महिला – पुरुष व्यक्ती आणि संस्थांना कार्यप्रवण करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देवून पुरस्कृत करण्याची दैदिप्यमान परंपरा असून जे कार्य उत्तम , उदात्त व उन्नत आहे , त्याची दखल घेवून त्या कार्यामागील राष्ट्रधर्मासाठी तत्पर कार्यवीरांची नोंद करून त्यांना गौरवान्वित करते

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *