बाजार सावंगी : खुलताबाद (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे सोबलगाव येथील लघुपाटबंधारे धरणाच्या पाळूवरुन अद्यापही बिनदिक्कतपणे वाहतूक सुरुच असल्याचे चित्र आहे.
सोबलगाव लघुपाटबंधारे धरणात पाणी साठा सुकला सर्रास बिनदिक्कतपणे
असल्याने शॉटकट रस्ता म्हणून पाळुच्या खालुन न जाता. पाळुच्यावरून भिंतीवरून वाहनधारक रस्ता वापरत आहे. यासंदर्भात दैनिकाने अनेक वेळा विभागाला बातम्या द्वारे अवगत केल्याने त्यांनी त्याची दखल घेत माहिती फलक लावून रस्ता प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून बोर्ड लावून भिंतींवर आडवा मुरमाचा गंज टाकून अडथळा निर्माण केला परंतु वाहनधारक
अद्याप ही विभागाला न जुमानता प्रतिबंधित क्षेत्र तथा मुरमाचा गंजा वरुन ओलांडून बिनदिक्कतपणे वाहतूक सुरु आहे. यामुळे धरणांची पालु दबत आहे. भविष्यात ही पाळू धोकादायक ठरू शकते. असा अंदाज अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वरिष्ठानी याकडे लक्ष घालून हा प्रकार थांबवावा असी मागणी शेतकरी नागरिकांतून होत आहे.
