पैठण (प्रतिनिधी शेख मोसिन) आगामी महात्मा ज्योतिबा फुले जयंती व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाणे, पैठण येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सपोनि सिद्धेश्वर गोरे, पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल, एकनाथ नागरगोजे, औदुंबर म्हस्के तसेच गोपनीय शाखेचे मनोज वैद्य व दिलवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत शांतता समिती सदस्य, विविध जयंती उत्सव समित्यांचे अध्यक्ष व सदस्य, व्यापारी संघटना प्रतिनिधी, नागरिक, पोलीस पाटील, तसेच स्थानिक प्रशासनाचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. या वेळी आगामी सण-उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा झाली. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.
