फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि भरत मोरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी !
छत्रपती संभाजीनगर : फर्दापूर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाकडून करण्यात आला आहे . असे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले असून सपोनि भरत मोरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी सतीश नारायण हिवाळे याला ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सपोनि भरत मोरे मागील अनेक महिन्यापासून मानसिक त्रास देत होते . तसेच पैशाची मागणी देखील करीत होते . पैसे दिले नाही तर तुला निलंबित करून तुझ्यावर कारवाई करेल असे बोलत होते. व अन्य कर्मचाऱ्यांसमोर हेतू पुरस्कार पणे अपमानित करीत होते.

अशी वागणूक देत असल्याचे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्नी पाशी सांगितले आहे. आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नी व नातेवाईक यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कुमार कोल्हे यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे . व कुटुंबाच्या वतीने सपोनि भरत मोरे ला अटक करून यांच्यावर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकासह समाज बांधव न्याय मागण्यासाठी उपस्थित होते.