फुलंब्री, (प्रतिनिधी) : गाडी बाजूला लाव असे सांगणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास कारचालकाने बेदम मारहाण, शिवीगाळ केली. फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात हा प्रकार घडला. या प्रकरणी कारचालकाविरोधात विरोधात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास रावजी गायके रा. गांगदेव पिंपळगाव, ता. फुलंब्री असे गुन्हा दाखल पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फुलंब्री येथील महात्मा फुले चौकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी वडते हे शनिवारी दुपारी दोन वाजता महात्मा फुले चौकात आपले कर्तव्य दे बजावत होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी (एमएच १२ एलव्ही ५४०६) उभी दिसून आली.त्यांनी गाडी चालक अंबादाय गायके यास गाडी बाजूला लाव असे सांगताच त्याने शिवीगाळ, मारहाण केली

. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक वडते यांना दुखापत झाली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात अंबादास गायके विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.