पोलीसाचा जिव वाचविणा-या रक्षकाचा मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर व पोलीस अधीक्षक यांचे हस्ते गौरव.

पोलीसाचा जिव वाचविणा-या रक्षकाचा मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र, छत्रपती संभाजीनगर व पोलीस अधीक्षक यांचे हस्ते गौरव.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) दि. १३/०१/२०२५ रोजी पोलीस उपनिरिक्षक श्री. दिपक उत्तमराव पारधे नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण हे सातारा परिसर येथुन बीडबायपास रोडने नायरा पेट्रोलपंप जवळुन येत असतांना पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकुन ते गंभीर जखमी झाले. तेथे श्री. गोविंद सत्यप्रेम सावंत रा. आयप्पा मंदिर जवळ बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर हे बाजुने जात होते, त्यांनी जखमी अवस्थेतील पोउपनि दिपक पारधे यांना तात्काळ औषध उपचार कामी नेणे अत्यंत गरजेचे असल्याचे ओळखुन त्यांनी कसलाही विचार न करता श्री. पोउपनि दिपक पारधे यांना तात्काळ पुढील उपचार कामी सिग्मा हॉस्पीटल येथे दाखल केले. त्यामुळे पुढील होणारी गंभीर घटना टळली, त्यांच्या या अतुलनीय साहस, कर्तृत्वाचा, धैर्याचा आदर करुन कृतज्ञतापूर्वक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे श्री. गोविंद सत्यप्रेम सावंत रा. आयप्पा मंदिर जवळ बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर यांचा मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, मा. पोलीस अधीक्षक, डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सतीष वाघ, यांनी त्यांना प्रशंसापत्र देवुन त्यांचा गौरव करण्यात आला.

प्रसंगी मा. विशेष पोलीस महानिरिक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, मा. पोलीस अधीक्षक, डॉ विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. सुनिल लांजेवार यांनी गोविंद सावंत यांचे आभार मानून समाजातील प्रत्येक मानसाने जिवन जगतांना आपली सामाजिक बांधीलकी जपली पाहिजे असे सांगुन प्रत्येकाने एकमेकांना अडचणीच्या प्रसंगी मदत केली पाहिजे असे आव्हाने केले.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *