नाशिक. (प्रतिनिधी). : सरकारी कर्मचारी लोकांची संघटना आहे पण राज्य पोलिस दला ची कोणत्याही प्रकारची संघटना नाही. पोलिस लोकांचे अनेक समस्या आहेत. पोलिस दलाच्या समस्याना वाचा फोड़न्यासाठी पोलिस हक्क संघर्ष संघटना स्थापन करण्यात आली आहे अशी माहिती एडवोकेट ज़ेबा अब्दुल कदीर शेख, राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांनी दिली आहे. ३० वर्षात पोलिस उप निरीक्षक (झडख ) या पदा वर पदोन्नति देण्यात आली पाहिजे. आज ही राज्यतील हजारों पोलिस अधिकारी कर्मचारी लोकाना पदोन्नति देण्यात आलेली नाही या साठी पोलिस हक्क संघर्ष संघटना काम करणार आहेत असे राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांनी माहिती दिली आहे. राज्य भर पोलिस हक्क संघर्ष संघटना चे सदस्य नोंदनी अभियान सुरु आहे. २०१३ या वर्षी झडख परीक्षा पास झालेले पोलिस कर्मचारी लोकांना अकरा वर्षा नंतर ही झडख या पदा वर नियुक्त करण्यात आ लेले नाहीत. अनेक पोलिस कर्मचारी सेवानिव्रत्त झालेले आहे.

२०१३ या वर्षा मधे झडख परीक्षा पास झालेले पोलिस लोकाना लवकरात लवकर झडख या पदा वर नियुक्त करण्यात आले नाही तर आज़ाद मैदान मुंबई येथे प्रचंड धरने आंदोलन करण्यात येईल असे संघटना चे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय सचिव, कार्यकारी अध्यक्ष संघटना चे जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडी चे अध्यक्ष आणि सारे पदाधिकारी यांनी माहिती दिली आहे. पोलिस हक्क संघर्ष संघटना चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट ज़ेबा अब्दुल कदीर शेख यांचे आदेशानुसार राष्ट्रीय सचिव राजेंद्र लाहाने, कार्यकारी अध्यक्ष गोपाल कच्छवे, यांचे मार्गदर्शन खाली राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांचे हस्ते परवीन काझी यांची नाशिक शहर अध्यक्ष पोलिस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य या पदावर नीवड करण्यात आली आहे. पोलिस हक्क संघर्ष संघटना चे महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सलमा नाहीद उपस्थित होते. दिनांक १ अक्टोबर २०२४ मंगलवार रोजी वडाला रोड नाशिक येथे नियुक्ति पत्र देण्यात आले आहे. पुढील कार्य साठी अभिनन्दन करुन शुभेच्छा देण्यात आले आहे.