सिल्लोड (भराडी प्रतिनिधी) अशोक दादा गरुड शैक्षणिक समूह संचलित ज्ञानविकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याची पोलिस अधीक्षक श्रीमान मनिषजी कलवानिया यांची भेट घेत सत्कार सन्मान केला.
बेरोजगारी कमी झाल्यास गुन्हेगारी आपोआप कमी होते म्हणुन विद्यार्थी दशेपासुनच योग्य मार्गदर्शन योग्य समुपन देणे गरजेचे. यासाठी मार्गदर्शन शिबिरे, व्यवसाय उद्योग नोकऱ्या तरुणांना लागव्यात यासाठी पोलिस अधीक्षक साहेब व पोलिस प्रशासन मेळावे घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन भराडी येथिल ज्ञानविकास विद्यालयात ५ मिनिटे थांबून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक समस्या जाणून घेत चर्चा केली.

यावेळी इयत्ता ५ वित शिक्षण घेत असलेली वेदिका शिवाजी गवळी या गरीब व होतकरू विद्यार्थिनीस नवोदय प्रवेश पूर्व चाचणीसाठी लागेल ती मदत करण्याचा शब्द पोलिस अधीक्षक साहेबांनी वडिल सोमनाथ व आई मनिषा यांना दिला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे, बीट जमादार वाय. कुलकर्णी, श्री. जाधव, सुभाष सरदार, रायभान जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख, गणेश ठोंबरे, संदीप साळवे, कृष्णा सपकाळ, सुरेश उगले, सुनिल साळवे, योगेश काकडे, दादाराव श्रीनाथे, सोपान जाधव, राजू घुलेसह विद्यालयाचे शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, पालक हजर होते.