छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधि) : सरकारी कर्मचारी लोकांची संघटना आहे परंतु महाराष्ट्र पोलीस दलाची कोणत्याही प्रकार ची संघटना नाही पोलिसांची संघटना नसल्यामुळे पोलिसांना सामूहिक मागणी करता येत नाही या साठी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य ची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती ऍडव्होकेट झेबा अब्दुल कदीर शेख यांनी दिली आहे. पोलिसांना वाढत्या कामाचा बंदोबस्त, कामाचा ताण, यामुळे हार्ट अटेक, मधुमेह, उच्च रक्तदाब,या सारखे आजारामुळे गेल्या अडीच वर्षात 427 पोलिसांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी विधान परिषद मध्ये दिली आहे. याच माहितीचा धागा धरून पोलिसांना आठ तास ड्युटी करण्यात यावी अशी मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटना चे राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन द्वारे केली आहे. तसेच पोलिसांना पदोन्नती देण्यात येत नाही 10 / 20 / 30 वर्ष सेवा केलेल्या पोलिसांना याचा लाभ मिळालेला नाही, अनेक पोलीस लोक सेवानिवृत्त झालेले आहे तर काही पोलिसांचे मृत्यू झालेले आहे त्या पोलिसांना पदोन्नती देण्यात आलेली नव्हती अशी माहिती मिळाली आहे. तसेच पोलीस वासाहेतीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी सारखे मूलभूत सुविधा देण्यात यावे. बंदोबस्त साठी पोलीस वेगळे आणि गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेगळे पोलीस देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदन द्वारे पोलीस हक्क संघर्ष संघटना चे राज्य सचिव नजीमोद्दीन काजी यांनी केली आहे.
