शहरातील विविध भागात चोरांचा उच्छाद; नागरिक हैराण
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पोलिसांचे नाव ऐकताच थरथर कापनारे गुन्हेगार आपण पाहिले असतील. मात्र आता पोलीस सुस्त, जनता त्रस्त अशी स्थिती वारंवारच्या घरफोड्या व चोऱ्यांमुळे, विनाकारण मारहाणीमुळे शहरवासीयांची झाली आहे, तर शहरातील विविध भागात असणारी पोलिसांची गस्त घालण्याची प्रक्रिया गेली कुठे ? तर एकप्रकारे हा शहर पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब असल्याचेच बोलले जात आहे. तर पोलिसांचा वचक संपून गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढला आहे कि काय असे घडणाऱ्या घटना कडे पाहता लक्षात येत आहे. शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. नागरिकांना दिलासा द्यावाघडलेल्या घटनांचा तातडीने तपास करून त्या उघडकीस आणाव्या, पोलिसांचा धाक निर्माण करावा जेणेकरून शहरवासीयांच्या मनात नागरिकांना शहर सुरक्षिततेची भावना निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परगावी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेलेल्यांच्या अनेक घरांमध्ये चोरी झाली आहे. संभाजीनगरात चेन स्नॅचिंग व मोबाईल हिसकावण्याचेही प्रकार होत आहेत. अनेकदा दोन गटांत हाणामारी, दगडफेक अशाही घटना घडल्या आहेत.तर गुन्हेगारीला वचक बसेल…यापूर्वी अमितेश कुमार हे पोलीस आयुक्त असतांना त्यांनी चार्ली पथका ची स्थापना केली होती. हे पथक सतत शहरातील प्रत्येक भागात पेट्रोलिंग करत असत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या हल प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनास्थळी ते तत्काळ पोहोचत असे. सोबतच त्यांच्या पेट्रोलिंगमुळे रस्त्यावर सुरु असलेले अनेक अवैध धंदे, महत्वाच्या ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र, सध्या शहरात वाढलेली नशेखोरी यामुळे अनेक गंभीर गुन्हे घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे.

कशामुळे घडतायत प्रकार ?
सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी सतर्क असले पाहिजे. कोणाबद्दल संशय येत असेल तर जवळच्या पोलीस ठाण्यास ही माहिती देणे आवश्यक आहे. तसेच विनाकारण वाद टाळावे. तर ऐकल्याने रात्री अपरात्री घराबाहेर पडणे टाळा. अशा विविध गोष्टीची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. शहरातील पोलिस ठाण्यांचा एकमेकांमध्ये, वरिष्ठांमध्ये समन्वय नाही. तसेच वाढती लोकसंख्या त्या पध्द्तीने अपुरे पोलिसांचे संख्या बळ, गुन्हे शाखा व अन्य पोलिसांच्या स्पर्धेतील ईर्षेचाही मोठा परिणाम, अनेक ठाण्यांच्या प्रभारींना, तपासाचे गांभीर्य नाही. न बहुतांश डीबी पथके अर्थपूर्ण कामांमध्येच अधिक व्यस्त. रात्र गस्तीत गांभीर्य नाही. गस्त घालणारे पोलिस दिसणेही दुर्मीळ पोलिसांचा वचक संपून गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढला
या भागात घडतायत घटना
लुटमारीच्या सर्वाधिक घटना एमआयडीसी वाळूज, वाळूज, एमआयडीसी सिडको, सातारा, जवाहरनगर, छावणी व सिडको ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत. सिङको बसस्थानक ते केम्ब्रिज चौक, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, विमानतळ परिसर, कॅनॉट प्लेस, जवाहरनगर, बीड बायपास, वेदांतनगर, क्रांतीचौक ते बाबा, वाळूज औद्योगिक वसाहतींमध्ये सातत्याने लुटमार होत आहे. आठ दिवसांपासून आकाशवाणी चौक ते त्रिमूर्ती चौक या मार्गावर पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान ट्रॅव्हल्समधून उतरलेले प्रवासी, कंपनीच्या बसची वाट पाहणारे कामगार, विद्यार्थ्यांना मारहाण करून लुटले जात आहे. काही महिलांचा पाठलाग केल्याचे स्थानिकांनी सांगितले. अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
छावणी हद्दीतील पडेगाव येथील ताजी घटना !

छत्रपती संभाजीनगर पडेगाव मीरा नगर येथील प्रकार पोलीस आयुक्त संदीप पाटील म्हणतात. दिलेले अर्ज निकाली काढा! पण वारंवार अर्ज देऊनही छावणी येथील पोलीस अधिकारी अर्जाची दखल घेत नाही.! पण धनाड्य गैर अर्जदाराच्या एकाच अर्जावरच कोणतीही शहानिशा करता गुन्हा दाखल करतात हा कुठला न्याय? पडेगाव येथील एक पीडित सावकाराच्या त्रासाला कंटाळून वारंवार अर्ज देत राहिला पण त्याला कुठलेच बंधन घातले गेले नाही ! पण पोलीस प्रशासनाच्या मदतीने सावकाराच्य एकाच अर्जावर पिडीतावरवर गुन्हा दाखल केला,” झुटे का बोलबाला सच्चे का मु काला “अशी पद्धत छावणी पोलीस स्टेशनची झाली आहे, न्याय कुठे मागणार?