पैठण ; शहरातील एक मंगल कार्यालयात विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर मान पान नाटयावरून झालेल्या वादात वधू वर पक्षातील लोकांनी लाथा बुक्यानी मारहाण करीत एकमेकांवर तुटून पडले यात महिलासह लहान मुले जखमी झाले असुन त्यांच्यावर पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले यावेळी पुलिस निरीक्षक संजय देशमुख, api सिध्देश्वर गोरे, सहाय्यक फौजदार सुधीर ओव्हळ , अजीज शेख , जमादार महेश माळी , राजेश आटोळे ,विलास सुखधान, भाऊसाहेब ठोकळ, आदींनी परस्थिती योग्य रित्या हाताळली शेवटचे वृत्त हाती आले असता या संदर्भात पैठण पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल केली गेली नाही….

पोलिसांनी घडविले माणुसकीचे दर्शन…..
मालेगाव जिल्हा नासिक हून आलेल्या वऱ्हाडी मंडळींना परक्या शहरात ओढवलेल्या संकट तसेच हाणामारीत जखमींना उपचार करण्यात रात्रीचे 9 वाजले होते त्यात 20 ते 25 वऱ्हाडी ज्यात पुरुष, लहान मुले व महिला रात्री 9 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यातच होते उशीर झाल्याने लहान मुले भुकेने व्याकूळ झाले होते मानवतेच्या दृष्टिकोनातून पैठण पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संजय देशमुख,api सिध्देश्वर गोरे यांनी लहान मुले व महिलांना चहापान व फराळाची व्यवस्था केली तसेच त्यांना औरंगाबाद पर्यंत जाण्यासाठी स्व खर्चातून वाहनाची व्यवस्था करून दिली या घटनेतून पैठण पोलिसांचे माणुसकी जपल्याची चर्चा शहरात सुरू होती