पैठण खेडा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा महाघोटाळा; दलित वस्तीचा निधी वळवून भ्रष्टाचार !

पैठण खेडा ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा महाघोटाळा; दलित वस्तीचा निधी वळवून भ्रष्टाचार !

छत्रपती संभाजीनगर :– पैठण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत पैठण खेडा, केसापुरी, नायगव्हान, खंडेवाडी, हनुमंतगाव अंतर्गत हर घर जलजीवन, स्मशानभूमी सुशोभीकरण, सिमेंट रस्ते, नाले खोलीकरण, अंगणवाडी बांधकाम, शाळा दुरुस्ती यांसारख्या योजनांतून कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राज्य घटना बचाव संघर्ष संघाच्या जिल्हाध्यक्ष निर्मला शाम भालेराव यांनी केला आहे. तक्रारीनुसार, खंडेवाडीतील दलित वस्ती सभामंडपाचे बांधकाम मूळ ठिकाणी न करता इतरत्र हलविण्यात आले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाणीवपूर्वक ड्रेनेजचे पाणी सोडून दलित समाजाचा अपमान करण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनांचा निधी मूळ लाभार्थ्यांकडे न देता इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारदारांच्या मते, २०२२–२३ ते २०२५ या कालावधीत वार्षिक प्रगती अहवाल व कृती आराखडा तपासल्यास सत्य समोर येईल. मात्र, या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या दलित समाजातील व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. निर्मला भालेराव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून, गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित अधिकाऱ्यांवर अट्रॉसिटी अॅक्टसह फौजदारी गुन्हे नोंदविण्याची मागणी केली आहे. तसेच, १३ ऑगस्टपासून १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्नत्याग साखळी उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
भालेराव यांनी ठामपणे म्हटले आहे की – “भारत स्वतंत्र होऊन दशकं झाली, पण दलित समाज आजही गावकुसाबाहेरच आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदारांनी विकासाचे स्वप्नच उध्वस्त केले आहे.”

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *