छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) दुचाकी पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकाने शर्टच्या खिशातील मोबाईल काढला आणि दुचाकीच्या टाकीतून आगीच्या ज्वाला भडकल्या काही कळायच्या आतच झालेल्या घटनेने दुचाकी स्वारासह कर्मचारी ही गांगरून गेले मात्र दुचाकी स्वाराने समय सूचकला दाढवत आगीच्या ज्वालांनी वेडलेली मोटरसायकल तशीच पुढे ढकलत नेली पण मोठा अनर्थ टळला ही थरारक घटना ४ जून रोजी बजाज कंपनीच्या गेट समोर असलेल्या पेट्रोल पंपावर घडली.बजाजनगरचे फूल विक्रेते शेख शाकेर हे बजाज कंपनी गेट समोर असलेल्या एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला गेले. पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी उभी केली आणि पंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोलची नळी दुचाकीच्या टाकीत टाकली. तर तो बाजूलाच उभा होता. पेट्रोल भरत असतांना ऑनलाईन पैसे देण्यासाठी त्यांनी शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल काढला. शाकेर यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढताच दुचाकीच्या पेट्रोल टाकीतून आगीचा लोळ बाहेर पडला. क्षणार्धात पेट्रोलने भडका घेतला, काही कळायच्या आत घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला. दुसरीकडे पेट्रोल पंपाच्या नळीलाही आग लागल्याने आगीचे लोळ बाहेर पडत होते.
पेट्रोल भरत असताना ग्राहकाने मोबाईल काढला शाकेर यांची समय सुचकता…
दुचाकीच्या टाकीतून आगीचे लोळ निघत असताना माडीवर बसलेल्या शाकेर यांनाही आगीचे चटके बसले. ते तात्काळ गाडीवरून खाली उत्तरले आणि आगीने वेढलेली दुचाकी तशाही अवस्थेत ढकलत ढकलत काही मीटर अंतरावर नेली. पेट्रोल पंपाच्या युनिट पासून दुचाकी दूर नेल्याने आग पसरली नाही. तेवढधात पंपावर उपस्थित कर्मचायांनी छोट्या अग्निशमन यंत्रांनी आगीवर फवारा मारला. त्यामुळे काही वेळातच पंपावरील आग आटोक्यात आली. मोबाईलच्या संपर्काने पेट्रोलने भड़का घेतला