पुणे (प्रतिनिधी) : सामाजिक भान आणि वैद्यकीय सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. तनिषा भिसे या गर्भवती महिलेला वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने प्रथम १० लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे कुटुंबीयांवर मोठा तणाव निर्माण झाला आणि त्यांना तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागले. दुसऱ्या रुग्णालयात प्रसूती दरम्यान तनिषाने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, मात्र तिचा प्राण गेला. विशेष म्हणजे तनिषाचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असूनही, मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षातून संपर्क साधूनही रुग्णालय प्रशासनाने मदतीचा हात दिला नाही. या घटनेने संपूर्ण पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. आमदार अमित गोरखे यांनी या प्रकरणात पोलिस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलीस चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवरून माहिती देत आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला जाणार आह
रुग्णालयावर कारवाई करा: संजय राऊत
यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या घटनेबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी भाष्य केले. सरकारमध्ये हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करा. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरांची नावे घेत आहेत, त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. माझं आव्हान आहे. त्या रुग्णालयावर कारवाई करा. ज्या बाईंचा काल मृत्यू झाला त्यांचे शाप लागतील तुम्हाला. आम्ही सामान्य आणि मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर बोलतो. आमची ती लेव्हल आहे. त्यांची ती लेव्हल नाही. काय चाललंय हे त्यांना अजिबात कळत नाही. भ्रष्टाचाराने किडला आहे हा महाराष्ट्र. गुन्हेगारी वााढली आहे. रस्त्यावर मुडदे पडत आहे. नागपूरला त्यांच्या घरासमोर गोळीबार झाला आणि एक माणूस मरण पावला, असेही संजय राऊतांनी म्हटले.

शिवसैनिकांनी चिल्लर फेकली
दरम्यान या प्रकरणामुळे वातावरण तापलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर मोठं आंदोलन सुरू झालं आहे. मंगेशकर रुग्णालयाने पूर्ण पैसे न दिल्याने डिलिव्ही करायला नकार