छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक चालकाला गवळी शिवरा शिवारात पुणे हायवेवर पकडले. चॉकलेटी रंगाचा आयशर (क्र.एम एच न०४ सी जी ०४४६) द्वारे प्रतिबंधित केलेला गुटका विक्री करण्याकरता पुणे येथे घेऊन जात होता

. आयशर चालक शेख वाहेद शेख मुसा (वय ३०) राहणार गवळीशिवरा तालुका गंगापूर याला अटक करण्यात
आली आहे. तर बाजीराव पान मसालाचे ८० पोते किंमत ४३ लाख ५१ हजार ३२० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.