छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : पिंप्रीराजा तालुका जिल्हा छ.संभाजीनगर येथे भाजपा नेते प्रकाश नाना चांगुलपाये यांच्या नेतृत्वाखाली
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली असता वक्तृत्व स्पर्धेत 18 स्पर्धकांनी भाग घेतला व रागोंळी स्पर्धेत 26 स्पर्धकांनी भाग घेतला यात रांगोळी स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय व वक्तृत्व स्पर्धेत 7 ते13 आणि 13 ते 20 वयोगट असे दोन गटात प्रथम, व्दितीय, तृतीय बक्षीस वितरण करण्यात आले.

प्रथम पारितोषिक भाजपा जिल्हा पदाधिकारी श्री.गजानंद बोहरा यांच्याकडून ठेवण्यात आला तर द्वितीय पारितोषिक कर्होळचे सरपंच श्री.मनीष राजळे तर तृतीय पारितोषिक सुनील भाऊ झांजरी व शाम भाऊ साबळे यानी दिले. यावेळी प्रकाश बापु पवार, अजय चव्हाण, मनोज पा. घनवट, कृष्णा रांजणे, अशोक पा. पवार, रामकिसन पा. भोसले, विठ्ठलराव कोरडे, तुकाराम पा. गोरे, सुभाष पा. ठोबंरे, ईश्वर रांजणे, सचिन नरवडे, नवनाथ निचीते,
आणि मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते