छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) पावसाळा सुरुवात झाली असली तरीही अपेक्षित पाऊस अजून पडलेला नाही. त्यामुळे अजूनही उकाडा जाणवत आहे. तसेच पाण्याची कमतरता असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले आहे. भाज्यांचे दर वाढल्याने सर्वसाम न्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे. सध्या घाऊक बाजारात भाज्यांच्या किंमती ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. तर काही भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. बाजारात मागणीच्या तुलनेत फक्त ६० टक्केच भाजीपाल्याची आवक होते.

त्यामुळे भाज्या महागल्या आहे. सध्याचे वातावरणदेखील भाज्यांच्या पिकासाठी चांगले नाहीये. पावसाळा लांबल्यामुळे अजून महिनाभर भाज्यांची कम तरता सांगण्यात येत आहे. भाज्यांसोबत हिरवा मसाला, अदकरचेही दर वाढले आहे. कोथिंबीरीची जुडी महागली आहे. याआधी हिरवा मसाला १० रुपयांना मिळायचा. तर तो आता २० रुपयांना मिळत आहे. तर कांदा बटाट्याचे भाव दुप्पट झाले आहेत. बटाट ४० ते ५० तर कांदा ५० रुपयांना विकला जात आहे. राज्यात घाऊक बाजारात भेंडी ४५ ते ५० रुपयांना विकली जात आहे. तर किरकोळ बाजारात भेंडी १२०-१४० रुपयांना विकली जात आहे. फरसबी
किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपयांना विकली जात आहे. गवार आणि घेवडा १०० ते १२० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. शिमला मिरची ८०-९० रुपयांना विकली जात आहे. शेवग्याची शेंग १०० ते १२० रुपये प्रति किलो विकली जात आहे. सुरण ८० ते ९० तर हिरवे मटार १८०-१२० रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. हिरवी मिरची १०० ते १२० रुपयांना विकली जात आहे. भाज्यांचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे.