पहाडसिंगपुरा बौद्ध लेणी परिसरात अवैध अतिक्रमण सुरू – लेणीच्या रक्षणासाठी बौद्ध समाज पुढे येणार का?

पहाडसिंगपुरा बौद्ध लेणी परिसरात अवैध अतिक्रमण सुरू – लेणीच्या रक्षणासाठी बौद्ध समाज पुढे येणार का?

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : ऐतिहासिक औरंगाबाद बौद्ध लेणी शहरात पहाडसिंगपुरा बौद्ध लेणीच्या पायथ्याला सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमण व मुरूम उत्खनन सुरू आहे. लेणीची ही गौतम बुद्धाचे पवित्र स्थान असून येथील जमीन काही गावगुंडांनी रात्रीच्या अंधारात JCB, पोकलँड , मायनिंग यांसारख्या यंत्रांच्या साहाय्याने तेथे सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे.

सध्या ३ ते ४ मशीन तिथे कार्यरत असून या कामामुळे लेणीच्या परिसरातील नैसर्गिक रचना आणि शांतता धोक्यात येत आहे. या मशिनरीमुळे होणाऱ्या कंपनांमुळे लेणीच्या संरचनेला तडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढं मोठं अतिक्रमण सुरू असताना, शहरातील आंबेडकरी चळवळीचे नेते आणि कार्यकर्ते कुठे आहेत, असा प्रश्न निर्माण होतो आहे.बंतुजी, जे सध्या घटनास्थळी उपस्थित आहेत, ते म्हणाले की, “जर मी एखाद्या मुस्लिम वक्फ बोर्ड (Muslim Waqf Board) चे जमिनीवर विहार बांधण्याचा प्रयत्न केला असता, तर मुस्लिम समाजाने मला तिथे बांधकाम करू दिलं असतं का?” या प्रश्नाद्वारे त्यांनी बौद्ध समाजाच्या उदासीनतेवर प्रकाश टाकला आहे. सर्व बौद्ध नेते आणि कार्यकर्त्यांना आवाहन आहे की त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि लेणीच्या रक्षणासाठी एकजूट दाखवावी.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *