छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): पाच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपौंच्या नातेवाईकांनी पिडीतेच्या कुटूंबावरच हल्ला चढवला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे वडील अंकूश सावंत आणि इतर आरोपी अशी आरोपींची नावे आहेत.लैंगिक शोषण केल्याप्रकरणी संशयित सुमित अंकूश सावंत याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावसिंगपुरा, लालमाती परिसरातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीला घरात मांजरासोबत खेळण्याच्या बहाण्याने त्याने लैंगिक अत्याचार केला. होता १ एप्रिल २०२४ ते ३१ मे २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी सुमित अंकुस सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

१५ जुलैला पीडित कुटूंब चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करून घरी परतले होते. यावेळी आरोपी अंकुश सावंत आणि इतर आरोपी त्यांच्या घरात घुसले. तुम्ही आमच्या मुलाविरुध्द तक्रार का केली. तुम्हाला जो पाहीजे तो खर्च घ्या, तक्रार मागे घ्या नाहीतर तुमच्या दोन मुलींना आम्ही पाहून घेऊ, असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. या प्रकरणी आरोपी अंकुश सावंत, त्याची पत्नी, संजय शिरसाठ, सोनू शिरसाठ, संजय शिरसाठचे आईवडील, संजय शिरसाठचे दोन मित्र यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.