छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) :- छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर हे भूमाफिया, गायरान जमिनी, महसूल विभागाला हाताशी धरून इलीगल प्लॉटिंग सरकारी जमिनीवर चुकीचे फेरफार करून करोडो रुपयांच्या जमिनी भूमाफियांनी घशात घातल्या त्याचे उदाहरण म्हणजे नुकतेच नवीन आलेले जिल्हा अधिकारी यांनी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांना निलंबित केले जवळपास त्यांनी 500 कोटीचा गैरव्यवहार केल्याचे दिसून येत आहे. तरीसुद्धा अद्याप महसूल विभाग झोपेतच आहे. छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक क्षेत्र पहाडसिंगपुरा बुद्ध लेणी परिसर येथे भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात डोंगर पोखरून जमीन लेवल करण्याचे काम सुरू आहे महसूल विभागाचा कानाडोळा.
