कन्नड {प्रतिनिधी हेमंत वाघ} ; छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील भिलदरी शफियाबाद ता कन्नड येथेल . परिसरात सलग आठ दिवसापासून परतीच्या पावसाने मुक्काम ठोकत मोठे थैमान घातले आहे .त्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घासच हिरावला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे . शेतकऱ्यांच्या नुकसानीची मालिका खंडित होईना .मक्का व जमिनीवर तर कपाशीच्या झाडावर कैऱ्या सडत आहे कन्नड ता . गावांचे परिस्थिती पाऊस आठ दिवसात दिवसापासून रात्रीचा मुक्काम ठोकून परिसराला जोरदार जोडपून काढले आहेत त्यामध्ये मक्का सोयाबीन कापूस यासारखे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे यावर्षी जून महिन्यापासून पावसाची चांगली सुरुवात झाल्यामुळे बळीराजा सुखावला होता शेतकऱ्यांना यामुळे जास्तीच खर्च करून मोलाचा महागाचा बी बियाणे आणून काळी आईच्या कुशीत टाकले त्यामध्ये मक्का कापूस सोयाबीन उडीद मुंग अद्रक यासारखे पिके घेतले आहे सुरुवातीपासून वेळेवर पाऊस आल्याने पिके चांगले जोमाने आले मागील कर्ज फेडले या आशेवर शेतकरी पिकांचे कापणी करत असताना परतीच्या पावसाने तीन चारदिवसास रात्रीचा मुक्काम ठोकत परतीचा पावसाने मोठे थैमान घातल्या आहेत त्यात जागी जागी जमिनीवर पडलेल्या मक्याची कोंब पडलेले आहे व तर कापसाचे वाती झाले आहेत त्यामुळे पिकांचे पूर्णपणे नासाडे झाल्याने आठ दहा दिवसापासून कन्नड ता .

भिलदरी येथे रोज पाऊस होत आहे यामुळे कापूस टाकलेल्या मक्का ला कोंबे उगले आहे तर कापसाच्या झाडावरच्या कैऱ्या सडत आहे शेतकऱ्यांच्या अति पावसामुळे अद्रक सड सारखं आजार लागला आहे दोन वर्षांपूर्वी अति पाऊस मागील वर्षा कोरडा दुष्काळ आणि यावर्षी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी फार संकटात सापडला आहे नुकसानग्रस्त मका कापूस सोयाबीन तूर या पिकांचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी व एक महिना अगोदर ढगफुटीमुळे भिलदरी श गावात खूप लोकांचे विहिरी व मालांचे नुकसान झालेले आहेत त्यांचे पण तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकरी करत आहे व शेतकरी कडून केले जात आहे आज गावात कृषी सहाय्यक चव्हाण साहेब यांनी भेट दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची नावे प्रेम सिंगल , अहमद शाहा, धारसिंग सिंगल भगवान छापुले उषाबाई वैष्णव संजय वैष्णव कामनबाई बहुरे संगिताबाई वैष्णव कैलास वैष्णव आर्जुन सिंगल सुनिल वैष्णव विठूल सिंगल ताराचंद बम्हणावंत राजु कायटे प्रभु महेर फकिरचंद महेर जयलाल बम्हनावंत कपुर कायटे भावलाल कायटे करन सिंगल रमेश पाटील विजय वैष्णव चंपालाल कायटे आर्जुन कायटे गोकुळ कायटे चंदन गोठवाळ धरम गोठवाळ भगवान राजपुत