पोलिसांची तत्परता : काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण, ६४ जणांना अटक !
छत्रपती संभाजीनगर( प्रतिनिधी) : पडेगावातील एका घराच्या समोर चार मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसान लाठ्या- काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील ६४ जणांना अटक केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.छावणी पोलिस ठाण्यात मोहम्मद जिशान नजर मोहम्मद (रा. मिटमिटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार अल्पवयीन मुले येऊन त्यांच्या घराच्या परिसरात सोमवारी दुपारी बसली. या मुलांना समजावून सांगितले असता, त्यातील एका मुलाने स्वत:च्या आईला बोलावून घेतले. त्या मुलाच्या आईने जिशान यांना मारहाण केली. त्यानंतर, काही वेळातच १०० ते १२५ लोकांचा जमाव चालून आला. या जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत दगडफेक केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याच वेळी शेख आरेफ शेख उस्मान (रा.कासंबरीदर्गा, पडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहेत.