छत्रपति संभाजीनगर,; मुद्दामहून पगार थकवण्याचे आदेश देऊन कामगार कायद्याचा भंग करणारे तसेच पगार रोखणाऱ्यावर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी आयटक संलग्न महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेने सहाय्यक कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे जानेवारी व फेब्रुवारी २०२५कामगारांचे पगार थांबवण्यात आले या विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटकने कामगार उपायुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. पगार आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, मुद्दामहून पगार अडवणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, कामगार उपायुक्त कार्यालयाने कामगारांसाठी काम केलेच पाहिजे, आयटक जिंदाबाद अशा घोषणांनी कामगार उपायुक्त परिसर दणाणून गेला. यावेळी उपायुक्त राऊत यांच्याशी अॅड. अभय टाकसाळ यांनी फोनवर संपर्क केला व कामगारांच्या व्यथा सांगितल्या. यावेळी निदर्शनात अॅड. अभय टाकसाळ, अभिजीत बनसोडे, आतिश दांडगे, नंदाबाई हिवराळे, दिपक मगर, रोहीत बटुल्ले, बंटी खरात, अमीत भालेराव, छाया लोखंडे, श्रीकांत बनसोडे, श्रीयोग वाघमारे, प्रमीला रत्नपारखे, अंजूम शेख, शिला मूजमुले, कविता जोगदंडे यांच्या सह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.