नासिक येथील भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील मटका जुगार अड्डे खुलेआम चालू पीआय गजेंद्र पाटील यांच्यावर आयुक्तांचा वरदहस्त !
नासिक (प्रतिनिधी) ; ऐंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसीम शेख यांनी नाशिक येथे काही कामानिमित्त भेट दिली असता काही ठिकाणी शहरात अवैध धंदे फार जोमात चालू असल्याचे निदर्शनास आले. नाशिक सारख्या शहरात मोठ्या प्रमाणात हिंदू धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या बऱ्याच ठिकाणी अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे त्यात भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध लॉटरी सेंटर चालतात बिनधास्तपणे! गोरगरीब मजूर आपल्या कष्टाचे पैसे पोटभर भाकर न खाता त्या लॉटरीत आपले नशीब आजमावण्यासाठी लावतात अक्षरशः बरेच परिवार यामध्ये उध्वस्त झाले आहे पण महाशय पोलीस निरीक्षक धनराज पाटील या गोष्टी कडे कानाडोळा करत आपला मलिदा
ओढण्याचे काम करत आहे पोलीस हवालदार हासे यांच्यामार्फत हप्ते वसुली जोमात सुरू आहे या गोष्टीला कुठेतरी आळा बसवून अवैध धंद्यावर कारवाई झाली पाहिजे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

ऐंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसीम शेख यांची प्रतिक्रिया
- नासिक सारख्या प्रसिद्ध पर्यटक व धार्मिक स्थळ असणाऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी फिरण्यासाठी व पूजा अर्चना करण्यासाठी येतात त्याच शहरात दारू, जुगार, मटका ,अवैध लॉटरी सेंटर या धंद्यांना मोठा प्रमाणात पोलीस यंत्रणे कडून मोठा सपोर्ट मिळत असल्याचे दिसून येते येथील पोलीस आयुक्त यांनी या अवैध धंद्यांना वरदहस्त करत स्थानिक पोलीस स्टेशन पीआय यांना आडमाप सूट दिलेली दिसत आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी या शहराकडे थोडे लक्ष देऊन येथील अवैध धंद्यांना तात्काळ आळा कसा बसेल या दृष्टिकोनातून अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कारवाई केली पाहिजे व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांनी केलेल्या कार्यकाळात किती गडगंज संपत्ती कमावली याची खाते निहाय चौकशी झाली पाहिजे.