मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार:आ.अमित गोरखे
सिल्लोड ; { प्रतिनिधी हेमंत वाघ/}; विधानपरिषदेची निवडणुक नुकतीच पार पडलेली असुन महायुती सरकारने मातंग समाजाचे अमीत गोरखे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली होती त्यामध्ये मोठ्या मताधिक्याने अमित गोरखे विजयी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे,ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सखाराम आहीरे , संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे यांच्या वतीने विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या सत्काराचे आयोजन सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात दि.२९ रोजी करण्यात आले होते. यावेळी सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकास आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच उपस्थित समाजबांधवाच्या वतीने ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून शाल व पुष्पगुच्छ देऊन अमित गोरखे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित समाजबांधवानी शासनदरबारी मातंग समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात गोरखे यांच्याशी चर्चा केली. सत्कार स्वीकारताना आमदार

अमित गोरखे म्हणाले की,महायुतीचे सरकार हे मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत असुन अनेक महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने मातंग समाजाच्या विकासाच्या दृष्टीने घेतलेले आहेत. काही प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच मि स्वतः मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करणार आसुन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य होतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी मातंग समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे,सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे,ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सखाराम आहीरे, सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई पवार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे,तालुका अध्यक्ष बाबुराव अहिरे, युवा तालुका अध्यक्ष फकीरचंद तांबे,शहर उपाध्यक्ष मनोज अहिरे,शहर सचिव सुनील अहिरे,शहर कार्याध्यक्ष रवींद्र महाले,शहर कोषाध्यक्ष राजेंद्र गोफणे, तालुका सचिव रतन अंभोरे,किसन सौदागर,भगवान सोनवणे,शिवाजी सोनवणे,शंकर लोधाळे, संतोष उन्होने, संदीप कांबळे,भगवान कांबळे,विलास कांबळे,किशोर सोनवणे शिवदास तुपे,सागर खेत्रे,कृष्णा सोनवणे,हरीश सौदागर,सुरेश सोनवणे,जयेश सौदागर,अशोक सोनवणे,पंढरी दनके,जनार्दन दनके,आत्माराम गायकवाड,भागवत आहीरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांचा सत्कार करताना ए बी एस क्रांती सेनेचे सिल्लोड तालुका पदाधिकारी