फुलंब्री (प्रतिनिधी : हेमंत वाघ)-- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष साजन बागल, तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव, जितेंद्र जयस्वाल युवा तालुकाध्यक्ष गणेश तांबे,युवा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव, माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे,बाळू तांदळे ,कृष्णा सोटम, बाबासाहेब शिनगारे, सुमित प्रधान,योगेश मिसाळ,राजू उबाळे गणेश तांदळे सुनिल जगताप यांची प्रमुख उपस्थिती होतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषकाचे देशभर आयोजन करण्यात आले असून भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने विविध खेळाचे आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगाने फुलंब्री येथे भारतीय जनता मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश तांबे, युवा शहराध्यक्ष वाल्मीक जाधव, गजानन नागरे, यांच्यावतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत 400 मुलांनी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. तसेच स्पर्धेमध्ये मुलींसाठी ३ किलोमीटर धावणे व मुलांसाठी ५ किलोमीटर धावणे अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली त्यात मुलींच्या गटात 1 शिवानी जाधव वानेगाव 2 कोमल चव्हाण नायगाव 3 अतिथी ठाले तळेगाव 4शिवानी कचोले जवखेडा 5 नंदा तिडके असडी यांनी बाजी मारली तर मुलांच्या गटात १ प्रितेश बाळू सोनवणे जळगाव २ राजू संजू खाडवे गणेश पुर ३ राजू बाबासाहेब नजर किनगाव यांनी बाजी मारली यावेळी चंद्रकांत राऊत, अजय नांगरे,योगेश पेटारे,भूषण काळे, कुलदीप सुरभैये,दिलीप मस्के,मयूर कोलते, आकाश गोरवणे,प्रेम जाधव, यश गायकवाड, यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या वेळी भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने बक्षीस पात्र विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
