दोघांवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): नक्षत्रवाडी खळवाडीत दारू विक्री करणाऱ्या एका युवकाने व त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेने दारू पिण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुलाच्या वडीलाने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या बाबतची माहिती अशी की, नक्षत्र वाडी बेंचमार्क परिसरात राहणाऱ्या सचिन दादासाहेब पागोरे हा युवक दिनांक २३ मे रोजी सायंकाळी
सहा ते सात वाजेच्या दरम्यान नक्षत्र वाडी येथे जखमी अवस्थेत आढलून आला. सचिन हा सतिश भालेराव व त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेचया घरासमोर जखमी अवस्थेत आढळला होता

. त्याच्या तोंडावर, अंगावर मारहाण केल्याने रक्त निघत होते. सतीश भालेराव व त्याच्या सोबत राहणाऱ्या महीलेने सचिन पगोरे यास उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे आवश्यक होते. पण त्यांनी त्यास दवाखान्यात घेऊन गेले नाही. तसेच त्याच्या आई वडिलांना याची माहिती दिली नाही. जवळपास पाच तासानंतर ही माहिती घरच्यांना दिली. सचिनचे वडील दादासाहेब बाबुराव पागोरे यांनी जखमी अवस्थेत सचिन याला उपचारासाठी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सचिनला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी दादासाहेब पागोरे यांनी सातारा पोलिस ठाण्यात या संबंधी सातीश भालेराव व त्याच्या सोबत राहणाऱ्या महिलेने मारहाण केली. त्यामुळेच सचिनचा मृत्यू झाला. अशी तक्रार दिली. त्यावरून सातारा पोलिस ठाण्यात सतिश भालेराव व त्याच्या सोबत राहणाऱ्या महिले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.