धक्कादायक ! ८०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये आढळला एचआयव्ही

धक्कादायक ! ८०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये आढळला एचआयव्ही

दिल्ली: एचआयव्ही हा एक धोकादायक विषाणू आहे ज्यामुळे एड्स होऊ शकतो. हा आजार आधी शरीराला पोकळ बनवतो. नंतर लहान आजार जीवघेणे ठरतात. आता त्रिपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिथे ८०० हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये HIV विषाणू आढळला आहे. आतापर्यंत ५७२ मुले जिवंत आहेत तर ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पुढील शिक्षणासाठी राज्याबाहेर गेली आहेत. त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

१) ,HIV: Positive श्रीमंत मुले करताय घाणेरडे काम

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २२० शाळा, २४ महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून संक्रमन झालेल्या या विद्यार्थ्यांची ही आकडेवारी समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे यातील बहुतांश मुले ही श्रीमंत कुटुंबातील आहेत. पण अचानक हा विषाणू कसा पसरला हे जाणून घेऊयात.

२) एचआयव्ही पसरण्यामागचं

सर्वात मोठं कारण म्हणजे एकाच सुईचा वापर करणे. एचआयव्ही हा एक जीवघेणारा आजार आहे. जी संक्रमित सुयांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर पसरते. ही स्थिती नेहमी इंट्राव्हेनस ड्रग्सच्या गैरवापरामुळे उद्भवतेय. एकच सुई अनेक लोकांच्या संपर्कात येते आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एचआयव्ही विषाणू शरीरातील द्रवपदार्थांमध्ये असतो. जर एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कात आला तर त्याचा प्रसार होतो. हा आजार रक्त, आईचे दूध, वीर्य आणि योनिमार्गातून पसरतो. एड्स हा एचआयव्हीचा शेवटचा टप्पा एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर शेवटच्या टप्प्याला एड्स म्हणतात. यामध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. नंतर त्याला इतर आजार होतात. ज्यामुळे नंतर त्याचा मृत्यू होतो. एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे या विषाणूचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे फ्लू. यामध्ये ताप, थंडी वाजून येणे, पुरळ उठणे, झोपेच्या वेळी घाम येणे, स्नायू दुखणे, घशात सूज येणे, थकवा येणे, लिम्फ नोड्समध्ये सूज येणे, तोंडात व्रण येणे अशी लक्षणं दिसतात. ही लक्षणे संसर्गाच्या २ ते ४ आठवड्यांच्या आत जाणवू शकतात.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *