दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजार पेठेतील दुकानदारांना सक्त ताकीद

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजार पेठेतील दुकानदारांना सक्त ताकीद

छत्रपती संभाजीनगर ।(प्रतिनिधी) : येऊ घातलेल्या दीपावली सणानिमित्त छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठेतील दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील मुख्य बाजार पेठ पैठण गेट ते सिटी चौक दुतर्फा असलेल्या जवळपास १००० दुकानदारांना अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख संतोष वाहुळे यांनी स्वतः दुकानदारांना सक्त ताकीद दिली. दुकानदारांनी आपल्या दुकानासमोर कुठलेही स्टॉल, टेबल लाऊन रहदारीस अडथळा निर्माण करू नये. आपल्या दुकानातच सामानाची विक्री करावी. नागरिकांना खरेदी करताना अडचण निर्माण होणार नाही विशेषतः महिलांना बाजारपेठेत खरेदी करताना अडचण निर्माण होऊ नये याची खबरदारी म्हणून संबंधित दुकानदारांना सक्त ताकीद देण्यात आली. असे अतिक्रमण आढळून आल्यास सबंधित दुकानदारावर प्रथम दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यानंतर ही दुकानदारांनी याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे सामान जप्त करण्यात येणार आहे

. तरी दुकानदारांनी मनपा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त महोदय यांचे समवेत नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव व २० नागरी मित्र पथक कर्मचारी यांची उपस्थिती होती.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *