) : नेहमी याच प्रमाणे धनाड्य सावकार पोलिसांसोबत चिरीमिरी करून पीडित कर्जदारावर हवी होणार का?
शहरातील नामांकित टू व्हीलर स्पेअर पार्ट दुकान मालक यांनी नामे पुनम सिंग कपूरसिंग सुलाने, रा. प्लॉट क्र. 05, एन 11 सी सेक्टर, हडको यांना केली आहे. गहान खत करतो म्हणून खरेदीखत करून घेतले. मी त्यावर त्यांना बोललो ‘असे का केले ते म्हणाले नॉर्मल प्रोसेस आहे तुम्हाला काही अडचण होणार नाही याची मी गॅरंटी घेतो असे बोलून मलाही पैशाची गरज होती त्यामुळे मी त्यांच्यावर विश्वास केला. त्यानंतर त्यांना मी वेळोवेळी व्याज देत गेलो व मुद्दलही देत गेलो पण तरीही त्यांनी मला चक्रवाढ व्याज लावून पुन्हा माझ्यावर तेवढीच रक्कम टाकली व 3,50,000/- (अक्षरी साडेतीन लाख रुपये) दिले त्यानंतर त्यांनी मी दिलेल्या चेकवर, 7,46,000 (अक्षरी सात लाख शेहेचाळीस हजार रुपये) चा चेक बँकेत टाकून बाउन्स केला. त्यानंतर त्यांनी गुंड पाठवून धमकावले, दुकान ताब्यात दे, तुझ्या घराला कुलूप लावतो, असे मानसिक व शारीरिक त्रास देणे चालू केले. त्यामुळे माझी आजारी आई माझी बायको व लहान चिमुकले मुले हे फार दहशतीत आहे. अक्षरशा आम्ही तिथे कुलूप लावून रहात असलेलं घर सोडून माझ्या सासरी राहत आहोत. कुठेतरी न्याय मिळेलया आशेवर जीवन जगत आहोत. सावकार वारंवार घराजवळ जाऊन सेल्फी फोटो काढून मला पाठवत आहे
