दलीत वस्तीतील भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकारावर जीवघेणा हल्ला — पोलिसांचा संशयास्पद मौन

दलीत वस्तीतील भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकारावर जीवघेणा हल्ला — पोलिसांचा संशयास्पद मौन

गंगापूर (प्रतिनिधी) : दलीत वस्तीतील जलजीवन मिशन आणि स्वच्छता प्रकल्पात भ्रष्टाचार उघड करणाऱ्या पत्रकार भगवान बनकर यांच्यावर एमआयडीसी परिसरात सुपारी देऊन जीवघेणा हल्ला करण्यात आला. बनकर यांनी वस्तीतील पाणीपुरवठा, शौचालये आणि स्मशानभूमीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा पर्दाफाश केला होता. भगवान बनकर यांनी दैनिक पब्लिकराज मध्ये या भ्रष्टाचाराची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यांनी याप्रकरणी सुहास वाघचौरे, ग्रामसेवक धनवयी मुळे, गादू भोंडवे, शिवाजी पवार आणि डाहोरे यांच्याविरोधात विभागीय आयुक्त आणि ग्रामीण आयुक्त कार्यालयात निवेदने दिली होती. मात्र, यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यानंतर, सुहास वाघचौरे आणि इतरांनी कटकारस्थान रचून गुंडांना सुपारी देऊन एमआयडीसी परिसरात बनकर यांचा अपघात घडवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सुदैवाने, त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बनकर यांनी रुग्णालयातच एमआयडीसी पोलिस बिट अंमलदारास संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. मात्र, इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुठलीही ठोस कारवाई केली नाही, तसेच आरोपींवर हाफ मर्डर किंवा तत्सम गुन्हे दाखल केलेले नाहीत, हे आश्चर्यकारक आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या निर्मला भालेराव यांनी जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषण आणि साखळी उपोषण करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्या न्यायालयात धाव घेऊन पोलिस यंत्रणेवरही संशय व्यक्त करणार आहेत.या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. पोलिस आणि प्रशासनाने याप्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *